राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची समस्या निकाली निघणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:12 PM2018-07-21T13:12:02+5:302018-07-21T13:13:47+5:30

National Highway Repair Problems Will Be Done | राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची समस्या निकाली निघणार 

राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची समस्या निकाली निघणार 

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या समस्येला आज खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, सदरची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती राज्य शासनाकडून करून ते सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी शनिवारी दिली.
राज्यात मोठया प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या कामाची प्रक्रिया अनेक महिने सुरु राहत असल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यावर नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या समस्येला आज खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. देशात वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकार ने सुद्धा अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु केले आहे. सध्या महाराष्टÑात ६ हजार ४११ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या महामर्गाच्या कामाची प्रक्रिया सुरु झाली आहे. वास्तविक राष्ट्रीय महामार्गाचे विकास आराखडे तयार करताना तसेच निविदा काढण्यात एक ते दिड वर्षाचा कालावधी जातो. या दरम्यान त्या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही वाढलेली वाहनांची संख्या बघता नगारिकांना अशा रस्त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो त्या अनुषंगाने या  रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित व्हावी म्हणून खासदार भावना गवळी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, सदरची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. देशात आता १ लाख ८० हजार किलोमीटर अंतराचे तयार करण्यात येत आहेत. देशात २२ टक्के अ‍ॅटोमोबाईलची वाढ होत असल्यामुळे हे रस्ते तयार करणे गरजेचे आहे. यातील ९१ हजार ते १ लाख ३० हजार पर्यंतचे  रस्ते राष्टÑीय महामर्गाघोषीत करण्यात आले आहे. या समोरचे प्रक्रीयेत असलेले रस्ते मुख्य राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. अशा मुख्य राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती ही राज्य सरकारने करावयाची आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करून त्याची दुरुस्ती केंद्र सरकार स्वत:कडे घेईल. त्यामुळे अशा महामार्गांच्या दुरुस्तीच्या प्रश्न संपुष्ठात आला आहे.

Web Title: National Highway Repair Problems Will Be Done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.