राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३१४ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:28 PM2019-09-16T18:28:25+5:302019-09-16T18:28:31+5:30
४३८१ प्रकरणांवर सुनावणी घेऊन ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विविध स्वरूपातील ४३८१ प्रकरणांवर सुनावणी घेऊन ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. १.२३ कोटी रुपये रक्कमेचे निवाडे पारित करण्यात आले.
राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.पी. देशपांडे, न्यायिक अधिकारी डॉ. रचना आर. तेहरा, एस.पी. शिंदे, स्वाती फुलबांधे, पी.एस. नेरकर, डॉ. यू.टी. मुसळे, जी.बी. जानकर, एम.एस. पौळ, एस.पी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुधीर डी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण ४३८१ प्रकरणे सुनावणीस ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच १.२३ कोटी रुपयांचे निवाडे पारित करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचाºयांनी सहकार्य केले.