राष्ट्रीय खेळाडूंनी साधला वाशिमच्या खेळाडूंशी संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:35 PM2018-07-25T14:35:02+5:302018-07-25T14:35:38+5:30

कबड्डीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे साहेबराव कानडे यांच्यासह अन्य राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी बुधवारी वाशिम येथील खेळाडूंशी संवाद साधला.

National players interacted with the players of Washim! | राष्ट्रीय खेळाडूंनी साधला वाशिमच्या खेळाडूंशी संवाद!

राष्ट्रीय खेळाडूंनी साधला वाशिमच्या खेळाडूंशी संवाद!

googlenewsNext
ठळक मुद्देकबड्डी खेळाबद्दल आत्मियता बाळगून खेळाचा नियमित सराव करावा, असे आवाहन कानडे यांनी याप्रसंगी केले.राष्ट्रीय खेळाडूंच्या भेटीनिमित्त जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला.


कबड्डीबाबत मार्गदर्शन : जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रास भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र पोलिस संघ, विदर्भ राज्य संघ तथा महाराष्ट्र शालेय संघाकडून खेळताना कबड्डीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे साहेबराव कानडे यांच्यासह अन्य राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी बुधवारी वाशिम येथील खेळाडूंशी संवाद साधला. कबड्डी खेळाबद्दल आत्मियता बाळगून खेळाचा नियमित सराव करावा, असे आवाहन कानडे यांनी याप्रसंगी केले.
राष्ट्रीय खेळाडूंच्या भेटीनिमित्त जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांच्यासह राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, अशोक राऊत, डॉ. भागवत महाले, दिलीप पवार, प्राचार्य बाळासाहेब गोटे, बादशाह धामणे, कुलदिप बदर, विनयक वदवर, राजेंद्र सौदागर, रफीक खान, किसन सोनटक्के, सलीम बेनिवाले, संजय शिंदे, शाम वानखेडे, संतोष कनकावार आदिंची उपस्थिती होती.

Web Title: National players interacted with the players of Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.