राष्ट्रीय मतदारदिनी वाशिमकर धावणार!
By admin | Published: January 19, 2017 02:15 AM2017-01-19T02:15:01+5:302017-01-19T02:15:01+5:30
प्रशासनातर्फे ‘मिनी मॅरेथॉन’; ५0 हजार रुपयांची बक्षिसे!
वाशिम, दि. १८- राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जनजगृती करण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने २५ जानेवारीला 'वाशिम मिनी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे.
'रन फॉर डेमोक्रसी' हे ब्रिदवाक्य असलेल्या या मिनी मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील महिला व पुरुषांना खुला प्रवेश राहणार आहे. विजेत्यांना सुमारे ५0 हजार रुपयांची रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी मतदार जागृतीच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.
ह्यवाशिम मिनी मॅरेथॉनह्णची सुरुवात २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता वाशिम पोलीस कवायत मैदान येथून होणार आहे. यामध्ये पुरुष गटाकरिता १२ किलोमीटर, तर महिला गटासाठी ८ किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉनमध्ये इतर जिल्ह्यातील स्पर्धकांनाही सहभागी होता येईल. मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसीलदार कार्यालये किंवा सहायक क्रीडा अधिकारी पांडे, जिल्हा समन्वयक राजेश बदर, स्वयंसेवी संघटना समन्वयक मनीष मंत्री यांच्याकडे नाव नोंदणी करता येईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय मतदारदिनी केला जाणार आहे.