मानोरा येथे राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती रॅली
By Admin | Published: July 6, 2017 02:34 PM2017-07-06T14:34:21+5:302017-07-06T14:34:21+5:30
मतदार नोंदणी करा अशा घोषणांनी मानोरा रस्ता दुमदुमुन गेला होता.
मानोरा : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय व तहसील कार्यालय याच्या संयुक्त विद्यमाने ५ जुलै रोज बुधवारला सकाळी ११ वाजता वसंतराव नाईक विद्यालयाच्या प्रांगणावरुन राष्ट्रीय मतदार नि जनजागृती रॅलीस मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात असता मतदार हाच, नागरिक जबाबदार, आणि मतदार नोंदणी करा अशा घोषणांनी मानोरा रस्ता दुमदुमुन गेला होता. मतदार रॅली तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार खाअीक निवडणुक विभाग व शिक्षक अनंत खडसे यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिवसाची माहिती प्रतिपादन केली असता १८ वर्षाखालील सर्व युवकांनी आपली नावे ८ जुलै ,२२ जुलै रोजी तलाठी, अंगवाडी शिक्षीका याच्याकडे नोंदवावीत,मतदार म्हणून भारताचा एक नागरीक म्हणून मतदान बहूमुल्य मतदान बहूमुल्य मतदान करावे असे सांगितले. यावेळी शाळेचे श्क्षिक गजानन कडबे, सरोज सोळंके, रुपेश जयस्वाल, संतोष आघाव, विकलसिंग राठोड, ज्योती इंगोले यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शाळेचे इयत्ता ८ वी ते १० वीचे सर्व विद्यार्थी हजर होते.