राष्ट्रीयीकृत बँकांचा अग्रीम कर्जास नकार!
By admin | Published: June 24, 2017 05:32 AM2017-06-24T05:32:16+5:302017-06-24T05:32:16+5:30
शासनाचे आदेशही धुडकावले; आरबीआयचे निर्देश नसल्याची स्पष्टोक्ती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कर्जमाफीस पात्र सर्व शेतकर्यांना तातडीने दहा हजार रुपये अग्रीम कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली असली तरी जिल्हय़ातील एकाही राष्ट्रीयीकृत बँकेत अशाप्रकारचे कर्ज देणे अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, ह्यआरबीआयह्ण आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयाकडून यासंदर्भात ठोस निर्देश प्राप्त होईपर्यंंंंत प्रक्रिया राबविता येणार नाही, असे सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
शासनाने २0 जून रोजी कर्जमाफीसंदर्भातील अटी, शर्ती आणि निकष शिथिल करत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंंंंत जिल्हा मध्यवर्तीसह इतर सर्व प्रकारच्या बँकांनी शेतकर्यांना खरीप हंगामाकरिता बी-बियाणे, खत यासह इतर साहित्य खरेदीसाठी १0 हजार रुपये अग्रीम कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले आहेत.
याबाबत जिल्हा उपनिबंधक स्तरावरूनही शासन अध्यादेशाच्या प्रतींसह दोन ते तीन वेळा बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकर्यांना दिल्या जाणार्या १0 हजार रुपये अग्रीम कर्जासंबंधी कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. परिणामी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयांकडून जिल्हास्तरावरील शाखांना स्पष्ट सूचना नसल्याने तातडीच्या कर्जवाटपाची प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासन-प्रशासनासोबतच बँकांनीही शेतकर्यांना आणले मेटाकुटीस
थकबाकीदार शेतकर्यांना खरीप हंगामासाठी तातडीने १0 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, २३ जूनपर्यंंंंत एकाही राष्ट्रीयीकृत बँकेनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. २४, २५ आणि २६ जून असे तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे निर्णय झाला तरी कर्जवाटप प्रक्रियेस मंगळवारनंतरच प्रारंभ होणार आहे.
३0 जून २0१६ पर्यंंंंतच्या थकबाकीदार शेतकर्यांनी १0 हजार रुपये कर्ज मिळण्यासंदर्भात बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे; परंतु बँकेत जाणार्या शेतकर्यांना खाली हात परत पाठविले जात आहे.
२0 जून २0१७ च्या शुद्धीपत्रकानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्ती १0 हजार रुपये कर्ज घेण्यास अपात्र ठरविण्यात आल्या आहेत; मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या सर्व शेतकरी खातेदारांना बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना आणि शासन अध्यादेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपासंदर्भात उदासीनता दर्शविल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून १0 हजार रुपये अग्रीम कर्जवाटपाचे निर्देश मिळालेले नाहीत. मंगळवारपर्यंंंंत यासंदर्भातील ह्यसकरुलरह्ण येण्याची शक्यता असून, त्यानंतरच खातेदार शेतकर्यांना अग्रीम कर्ज दिले जाईल.
- विजय नगराळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम
राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंंंंत अग्रीम कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करायला हवी होती. यासंदर्भात अध्यादेशाच्या प्रतींसह बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मंगळवारी वरिष्ठांसोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा चर्चिल्या जाईल.
- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम