ग्रामपंचायतींच्या प्रतिष्ठांना नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:22 AM2021-02-28T05:22:48+5:302021-02-28T05:22:48+5:30

भर जहागिर : कोरोना विषाणू संसर्गाची भीती बहुतांश गावातील घरांच्या अंगणामध्ये या जिवघेण्या विषाणूचे आगमण झाल्यानंतरही नागरिकांची बेफिकिरी कायम ...

Natis to the prestige of the Gram Panchayat | ग्रामपंचायतींच्या प्रतिष्ठांना नाेटीस

ग्रामपंचायतींच्या प्रतिष्ठांना नाेटीस

Next

भर जहागिर : कोरोना विषाणू संसर्गाची भीती बहुतांश गावातील घरांच्या अंगणामध्ये या जिवघेण्या विषाणूचे आगमण झाल्यानंतरही नागरिकांची बेफिकिरी कायम असून उशीरापर्यंत आपली प्रतिष्ठाणे उघडी दिसल्याने लोकमतने 'ग्रामीण भागातील प्रतिष्ठाणे उशीरापर्यंत उघडीच' या आशयाचे वृतांकन केले हाेते. या वृत्ताची दखल ग्रामपंचायतींनी घेतली असून परीसरातील सर्वच ग्रामपंचायतीनी प्रत्येक प्रतिष्ठानाला नोटीस बजावत शासनाच्या नियमावलीचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मोप प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येना-या मोप, लोणी,बोरखेडी , वाकद, मोठेगाव, एकलासपूर, करडा, भर जहागिर, मांडवा, कंकरवाडी, आगरवाडी, चिचांबाभर या गावामध्ये वेगाने कोरोनाचे रूग्ण वाढत असून अवघ्या सात दिवसामध्ये सुमारे ३७ कोरोणा विषाणूचे रूग्ण आढळून आले. काेराेना आता ग्रामीण भागामधुन सक्रिय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसामध्ये तर आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याने अनेकांची भांबेरी उडाली. आशा स्वयंसेविकांना आरोग्य विभागाच्या सुमारे ८४ आरोग्य सुविधांची घरोघर जात प्रसिध्दी द्यावी लागते. तेव्हा कोरोणा विषा चा फैलाव कमी करण्यासाठी तात्काळ मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावामध्ये कोरोणा तपासणी शिबिरांची नितांत गरज आहे.

Web Title: Natis to the prestige of the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.