नावलीची जि.प. शाळा भरली ‘मिनी मंत्रालयात’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:48 AM2017-11-07T01:48:19+5:302017-11-07T01:48:50+5:30
वाशिम: जिल्ह्यातील नावली (ता.रिसोड) या गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांची झालेली बदली विनाविलंब रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा परिषदेसमोरच सोमवारी शाळा भरविली.
लोकमत न्यूज नेटवर्क

सन १९३६ साली स्थापन नावलीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून अविश्रांत मेहनत घेऊन शाळेला प्रत्यक्षात ‘ज्ञान मंदिर’ केले. दर्जात्मक शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याने गुणवत्ता वाढीस लागली. त्यामुळेच कधीकाळी १४५ पटसंख्या असलेल्या या शाळेत आजमितीस ४३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असताना या शाळेतील शिक्षकांची बदली करण्यात आली. त्याविरोधात गावकर्यांसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी सोमवारी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा परिषद कार्यालय परिसरातच शाळा भरवून शिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी लावून धरली.