जिल्ह्यातील २६ केंद्रांवर आज नवोदयची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:44+5:302021-08-12T04:46:44+5:30

जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग पाचवीच्या प्रवेशा करीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सात महिन्यापूर्वीच पार पडली. या ऑनलाईन अर्जानुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश ...

Navodaya examination at 26 centers in the district today | जिल्ह्यातील २६ केंद्रांवर आज नवोदयची परीक्षा

जिल्ह्यातील २६ केंद्रांवर आज नवोदयची परीक्षा

googlenewsNext

जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग पाचवीच्या प्रवेशा करीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सात महिन्यापूर्वीच पार पडली. या ऑनलाईन अर्जानुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र तयार करण्यात आले असून, परिक्षेची नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्याकरिता दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा बुधवारी होऊ घातली असून जिल्ह्यातील ६ हजार १८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. याकरिता सहाही तालुक्यामध्ये २६ परीक्षा केंद्र सज्ज झाले आहे. सर्वसामान्य परिवारातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातही वाशिम येथे नवोदय विद्यालय असून या विद्यालयात सहावीमध्ये प्रवेश देण्याकरिता दरवर्षी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांनी योग्य प्रवेश पत्र घेऊन निर्धारित वेळेच्या आत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जवाहर नवोदयचे प्राचार्य रवींद्र चंदनशिव यांनी केले आहे.

-----

विद्यार्थ्यांना घ्यावयाची विशेष काळजी -

१) परीक्षेचे योग्य ते अ‍ॅडमिशन कार्ड सोबत ठेवावे.

२) निळा किंवा काळा बॉल पॉईंट पेन वापरावा

३) सोबत मोबाईल, कॅल्क्युलेटर, स्मार्ट घड्याळ, ब्लूटूथ ,कंपास इत्यादी साहित्य ठेवता येणार नाही.

४) सकाळी १०.३० पर्यंत दिलेल्या केंद्रावर उपस्थित राहावे. गर्दी टाळावी.

५) पालक, नातेवाईक यांना परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश नाही

६) उशिरा येणाऱ्या (सकाळी ११.३० नंतर) विद्यार्थ्यांना प्रवेश नाही .

७) परीक्षा कक्ष दुपारी १.३० पर्यंत सोडता येणार नाही.

३) कोविड-१९च्या नियमावलीचे पालन सर्वांनी करावे.

Web Title: Navodaya examination at 26 centers in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.