नवोदयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संरक्षणाची शपथ
By admin | Published: May 5, 2017 01:49 PM2017-05-05T13:49:18+5:302017-05-05T13:49:18+5:30
विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाºयांनी आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे वसुंधरा सरंक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चंदनशिव हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
या कार्यक्रमाप्रसंगी भविक बोडखे ने आपले पर्यावरण विषयक विचार व्यक्त केले तसेच विद्यालयाचे शिक्षक एस.पी.काळे, टिजीटी गणीत यांनी धरती हमारी माता है ही कविता सादर केली तसेच डी.डब्ल्यु.घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण विषयावर इंग्लीशमध्ये एक लघुनाटक सादर केले.
विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक जी.के.घोगरे, विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करते वेळेस पर्यावरणाविषयक जागरुक राहण्याचे आवाहन केले व पर्यावरण संरक्षणाचे वेगवेगळे उपयांवर चर्चा केली. विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चंदनशिव यांनी प्रदुषण आणि रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे होणारी भूमीची हानी यावर आपले विचार व्यक्त क रुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रेया आरु ने केले. या कार्यक्रमामधये विद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता साखरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी विद्यार्थीनीचा सहभाग होता.