मालेगाव येथे नवोदय विद्यालय परिक्षेची रंगीत तालीम; ५०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:04 PM2018-01-29T14:04:36+5:302018-01-29T14:06:57+5:30
मालेगाव:- इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परिक्षा द्यावी लागते. या परिक्षेचा सराव विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालयात रविवारी मोफत सराव परिक्षेचे आयोजन, तसेच मार्गदर्शन करण्यात आले होते.
मालेगाव:- इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परिक्षा द्यावी लागते. या परिक्षेचा सराव विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालयात रविवारी मोफत सराव परिक्षेचे आयोजन, तसेच मार्गदर्शन करण्यात आले होते.या परिक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळा मिळून ५० शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात उत्कृष्ट कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मनातील नवोदय परिक्षेची भीती दूर व्हावी, वेळेचे बंधन पाळून भयमुक्त वातावरणात त्यांना परिक्षा देता यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालयात तालुकास्तरीय मोफत सराव परिक्षा घेण्यात आली. नवोदय प्रवेश परिक्षेच्या धर्तीवर या परिक्षेत विद्यार्थ्यांकडून प्रश्न सोडवून घेण्यात आले. या परिक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळा मिळून एकूण ५० शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये तालुक्याच्या बाहेरीलही काही विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही परिक्षा घेण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यााचा गुणानुक्रम निश्चित केला. यात सर्वाधिक गुण मिळवणाºया पहिल्या दहा जणांना बक्षीस प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंदडा विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सतीश नवगजे, तर प्रमुख अतिथी म्हणून नवोदय विद्यालय वाशिमचे प्रा. काळे, प्रा. मदनकार तसेच विद्यालयाचे व्यवस्थापक गोविंद पुरोहित, नीता किरण जिरवणकर, जगदीश बळी, डॉ. सीमा चव्हाण, नगरसेविका सुषमा सोनोने, प्रा. सावजी, विलास परिहार, आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजेश मोरे यांनी केले प्रास्ताविक अमोल कल्याणकर यांनी केले. पहिल्या दहा विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रासह भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. निकालाचे वाचन राजेंद्र गिरी यांनी तर आभार प्रदर्शन संजय साबळे यांनी केले.