नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेचे अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:08+5:302021-09-21T04:47:08+5:30

००००० आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा वाशिम : कोरोना चाचण्या, लसीकरण मोहीम, व्हायरल फिव्हर आदी मुद्दयांच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी ...

Navodaya Vidyalaya invited applications for entrance examination | नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेचे अर्ज मागविले

नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेचे अर्ज मागविले

Next

०००००

आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

वाशिम : कोरोना चाचण्या, लसीकरण मोहीम, व्हायरल फिव्हर आदी मुद्दयांच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सोमवार, २० सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने आरोग्य विभागाचा आढावा घेतला.

००००००

जमिनीचा मोबदला देण्याची मागणी

वाशिम : लघु पाटबंधारे विभागाअंतर्गतच्या उमरी प्रकल्पाकरिता शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मोबादला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

०००

शिरपूरचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

कायम

वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे १९ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत अवकाळी पाऊस, वारा व गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले होते. मात्र, अद्याप भरपाइ मिळालेली नाही. शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

००००

तिब्बल सीट वाहतूक; पोलिसांची कारवाई

वाशिम : स्थानिक पाटणी चौकात शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास प्रामुख्याने तिब्बल सीट वाहतूक करणाऱ्या ३५ दुचाकी वाहनांवर कारवाई केली.

००००

तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला

वाशिम : क्रीडाप्रेमी युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणेच वाशिम तालुका क्रीडासंकुलही उभारले जावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र हा प्रश्न निकाली निघाला नाही.

....

अनुदानाअभावी रखडली घरकुले

वाशिम :रिठद, गोभणी, हराळ, केनवड परिसरात अनुसूचित जातीमधील अनेक लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले; परंतु १० महिने उलटत आले तरी या लाभार्थींच्या खात्यात घरकुल अनुदानाचा निधी जमा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे रखडली आहेत.

Web Title: Navodaya Vidyalaya invited applications for entrance examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.