राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगरूळपिरात ‘गद्दार दिन’ आंदोलन आणि घोषणा
By संतोष वानखडे | Published: June 20, 2023 02:36 PM2023-06-20T14:36:07+5:302023-06-20T14:36:38+5:30
घोषणाबाजीने वेधले लक्ष
संतोष वानखडे, वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २० जून रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी करून ‘गद्दार दिन’ आंदोलन करण्यात आले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला २० जून रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. त्यामूळे खोकेविरांच्या वर्षपुर्तीनिमीत्त एक दिवसीय गद्दार आंदोलन राबविण्यात येत आहे. खोक्याचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली असल्याचा संदेश या निषेध आंदोलनातून देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आर.के.राठोड, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शालिग्राम पाटील, बाजार समितीचे उपसभापती बबलू ऊर्फ राजकुमार गावंडे, माजी पं. स. सभापती भास्कर पाटील शेगीकर आदींची उपस्थिती होती.
घोषणाबाजीने वेधले लक्ष
आम्ही स्वाभीमानी मराठी, गद्दार पाठवु गुहाटी, चले जाव, चले जाव.. गद्दार गुहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त.. खोके घेऊन गद्दार मस्त, खोके सरकारचा चालणार नाही थाट, गद्दारांना दाखवु कात्रजचा घाट, पन्नास खोके गद्दार नॉट ओके, खोके सरकार हाय हाय, गद्दारांना येथे जागा नाय, अशा विविध घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. या घोषणांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.