पार्डी ताड ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:30 AM2021-02-22T04:30:46+5:302021-02-22T04:30:46+5:30
पार्डी ताडच्या सरपंचपदी रुख्मिना बाळू लांभाडे, तर उपसरपंचपदी भारत बापुराव भगत यांची बिनविरोधी निवड करण्यात आली. माजी राज्यमंत्री ...
पार्डी ताडच्या सरपंचपदी रुख्मिना बाळू लांभाडे, तर उपसरपंचपदी भारत बापुराव भगत यांची बिनविरोधी निवड करण्यात आली. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे व जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत नऊपैकी आठ उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये सरपंचपदी रुख्मिना बाळू लांभाडे तर उपसरपंच भारत बापुराव भगत यांची अविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीत सदस्यपदी मुरलीधर भिकाजी माचलकर, परशराम विश्वनाथ लांभाडे, रेखा दादाराव सुर्वे, अर्चना श्रीकृष्ण ठाकरे, शिल्पा ज्ञानेश्वर शेंद्रे, शिल्पा गजानन कुटे यांची मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पार्डीताड ग्रामपंचायतची सदस्य संख्या नऊ असून यामध्ये एक सदस्य संख्या ही अनुसूचित जमाती सदस्य नसल्यामुळे रिक्त आहे. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुकीमध्ये अध्याशी अधिकारी श्रीकांत माने, विस्तार अधिकारी तर ग्रा.पं. सचिव एस.आर. काजळे उपस्थित होते. (वा.प्र.)