राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘रास्तारोको’

By admin | Published: December 15, 2014 12:48 AM2014-12-15T00:48:07+5:302014-12-15T00:48:07+5:30

शेतक-यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आंदोलन.

NCP's 'Raastarko' | राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘रास्तारोको’

राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘रास्तारोको’

Next

वाशिम : शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस १४ डिसेंबरला रस्त्यावर उतरली होती. राज्यातील सत्तारूढ महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या नेते व पदाधिकार्‍यांनी स्थानिक पुसद नाका चौकात रास्तारोको आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. राज्यात सद्या दुष्काळी परिस्थिती आहे. लागवर्ड खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. खरिप बुडाला, रब्बी हंगामही बुडण्याच्या मार्गावर आहे. मात्र, राज्यात सत्तारूढ झालेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्षांचे महायुतीच्या सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी वार्‍यावर सोडले आहे असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉग्रेसने १४ डिसेंबरला स्थानिक पुसद नाका चौकात रास्तारोको आंदोलन केले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी या मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. पोलीसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या या आंदोलनामुळे पुसद, अमरावती, कारंजा, मंगरूळपीर, हिंगोली, नांदेड, परभणी आदी मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. परिणामी, या मार्गावर वाहनांची लांबलचक रांग लागल्याचेही दिसून आले. यावेळी आंदोलकांनी यावेळी सुभाषराव चौधरी, भाष्कर पाटील शेंगीकर, विनोद पट्टेबहाद्दूर, मंगेश धानोरकर, मनिष चिपडे, आदींसह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जिल्हाभरातून शेतकर्‍यांनीही या आंदोलनात हजेरी लावली होतीनायब तहसिलदार निलेश मडके यांना निवेदन सादर केले.

Web Title: NCP's 'Raastarko'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.