जवळा ग्रामपंचायत सचिव माहिती देण्यास करीत आहे टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:18 AM2021-02-18T05:18:24+5:302021-02-18T05:18:24+5:30

जवळा ग्रामपंचायतमध्ये एक वर्षामध्ये कोणतीही मासिक सभा घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत सदस्यांनी कामांबद्दल माहिती विचारली असता ती दिली जात ...

The nearby Gram Panchayat Secretary is trying to provide information | जवळा ग्रामपंचायत सचिव माहिती देण्यास करीत आहे टाळाटाळ

जवळा ग्रामपंचायत सचिव माहिती देण्यास करीत आहे टाळाटाळ

Next

जवळा ग्रामपंचायतमध्ये एक वर्षामध्ये कोणतीही मासिक सभा घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत सदस्यांनी कामांबद्दल माहिती विचारली असता ती दिली जात नाही. कोणत्याही मिटींगचा भत्ता दिला जात नाही. ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ग्रामपंचायतीचे कुठलेही रेकॉर्ड पुस्तक दाखविण्यात येत नाही. ग्रामपंचायतअंतर्गत कोणती कामे केली, हेदेखिल कळत नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतमध्ये कागदोपत्री व्यवहार सुरू असतात. या कामाची कुठलीही प्रोसिडिंग पुस्तकात नोंद केली जात नाही. २०१८ ते २०२० पर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणती कामे केली, याची माहिती मागितली असता देण्यात आली नाही. त्यामुळे अखेर माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागविण्यात आल्याचे ग्रा.पं. सदस्य दुर्गाबाई चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: The nearby Gram Panchayat Secretary is trying to provide information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.