राज्यातील शाळांकरिता आरटीई निधीची गरज.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:30+5:302021-03-29T04:23:30+5:30

शाळांची चार वर्षाची आरटीई प्रतिपूर्ति रक्कम मागणी सुमारे १८५० कोटी रुपये आहे, त्यातील २४ मार्च रोजी फक्त ५० काेटी ...

The need for RTE funding for schools in the state. | राज्यातील शाळांकरिता आरटीई निधीची गरज.

राज्यातील शाळांकरिता आरटीई निधीची गरज.

Next

शाळांची चार वर्षाची आरटीई प्रतिपूर्ति रक्कम मागणी सुमारे १८५० कोटी रुपये आहे, त्यातील २४ मार्च रोजी फक्त ५० काेटी रुपये वितरित करण्यात आली.

सन २०१९-२० या वर्षात एकूण ३ लाख ५३ हजार ४०२ विद्यार्थी ह्या योजनेत शिकत असून याकरिता एकूण आरटीई प्रतिपूर्ति मागणी ६२४ कोटीची आहे. मात्र ५० कोटी रुपये देण्यात आले. ५० टक्केच रक्कम कशी क़ाय वितरित केली जाऊ शकते, असा सवाल आरटीई फाऊंडेशनच्यावतीने केला आहे. यापूर्वी सुध्दा २०१७-१८, २०१९-२० मधे चुकीची आकडेवारी सांगून शाळांना कमी रक्कम दिली, असा आरोप फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.सचिन काळबांडे यांनी केला आहे. जोपर्यन्त शासन शाळांना आरटीई प्रतिपूर्ति रक्कम पूर्ण देण्याची तरतूद करणार नाही, तो पर्यन्त राज्यातील खाजगी शाळा आरटीई प्रवेश देणार नाही. प्रसंगी आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा फाऊंडेशनतर्फे देण्यात आला आहे.

...........

काेट ...

आम्ही वाशिम जिल्हा इंग्रजी शाळा संस्थाचालक,राज्यातील विविध संघटनांना जिह्याच्या ठिकाणी स्टेज उपलब्ध करुण देऊ व ज्यांची मागणी रास्त असेल त्यांचेसोबत राहू. मागील काही वर्षाचा २५ टक्के प्रतिपूर्ति परतावा शासनाकडे बाकी आहे, तो त्वरित त्याचवर्षी शासनाने द्यायला पाहिजे तरच् खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलाना शिक्षणामध्ये न्याय मिळेल.

-अभिजित देशमुख

विदर्भ अध्यक्ष, मेस्टा व सदस्य आरटीई फाऊंडेशन.

Web Title: The need for RTE funding for schools in the state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.