आराेग्य वर्धिनी क्रेद्रांत साहित्य पाठविण्याचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:55+5:302021-03-13T05:16:55+5:30
काजळेश्वर उपाध्ये : काजळेश्वर येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात अत्यावश्यक साहित्याची वारंवार मागणी करून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र या ...
काजळेश्वर उपाध्ये : काजळेश्वर येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात अत्यावश्यक साहित्याची वारंवार मागणी करून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसते, असा आरोप प्रहार जनशक्ती संघटनेच्या स्थानिक सेवकांनी केला आहे .
आरोग्य वर्धीनी उपकेंद्रात इन्व्हर्टर, टेबल, खुर्च्या व इतर आवश्यक साहित्याची वारंवार मागणी केल्या गेली मात्र तिची पूर्तता झाली नाही . भारनियमन कालावधीत विद्युत पुरवठा नसतांना रात्रीचेवेळी होणाऱ्या प्रसूतीच्या वेळी अंधारात दिव्याच्या उजेडाचा आधार घ्यावा लागतो. गावातील माता-भगिनीची प्रसूती डॉक्टर, नर्स, आशासेविका यांना अंधारातच करावी लागते त्यामूळे जिवित्वास धोका संभवतो. प्रशासनाने या मागणीकडे लक्ष द्यावे व आवश्यक साहीत्याचा पुरवठा करावा अशी मागणी स्थानीक जनप्रहार संघटनेच्या सेवकांनी केली आहे.