‘अस्थिं’चे पाणी करणारे ‘पदमतिर्थ’दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 07:25 PM2017-07-31T19:25:59+5:302017-07-31T19:28:44+5:30

वाशिम : शहरामध्ये असलेल्या पुरातन पदमतिर्थ तलावामध्ये अस्थिंचे विसर्जन केले असता त्याचे पाणी होत असल्याचा लौकीक आहे. परंतु सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित दिसून येत आहे.

neglected 'Padmartha' in washim | ‘अस्थिं’चे पाणी करणारे ‘पदमतिर्थ’दुर्लक्षित

‘अस्थिं’चे पाणी करणारे ‘पदमतिर्थ’दुर्लक्षित

Next
ठळक मुद्दे अस्थि विसर्जनानंतर त्यांचे पाणी होत असल्याचा लौकीकपौराणिक ग्रंथ ‘वत्सगुल्म महात्म्य’मध्ये या पदमतिर्थाचे महत्व विषद सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित


 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरामध्ये असलेल्या पुरातन पदमतिर्थ तलावामध्ये अस्थिंचे विसर्जन केले असता त्याचे पाणी होत असल्याचा लौकीक आहे. परंतु सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित दिसून येत आहे. यासंदर्भात काही नागरिकांचे म्हणणे आहे की या पाण्यामध्ये ‘फ्लोराईड’घटक असल्याने अस्थिचे पाणी होते. पौराणिक ग्रंथ ‘वत्सगुल्म महात्म्य’मध्ये या पदमतिर्थाचे महत्व विषद केले आहे. येथे प्रसिध्द शिवालय असून श्रावण मासात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. परंतु या तिर्थाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला दिसून येत नाही. याकडे संबधितांनी लक्ष देवून याला प्रेक्षणीय धार्मिक स्थळ बनविल्या जाऊ शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया मान्यवरांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
 

Web Title: neglected 'Padmartha' in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.