पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:35 PM2019-03-04T12:35:46+5:302019-03-04T12:36:04+5:30

मंगरुळपीर   : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प प्राणिशास्त्र विभागातर्फे राबविण्यात आला.

Nest and water management project for birds | पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प

पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर   : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प प्राणिशास्त्र विभागातर्फे राबविण्यात आला. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी व निवारा मिळेल , ज्याचा फायदा ‘बायोडायव्हर्सिटी’करिता होते व पक्ष्यांची संख्या वाढते आणि शेतातील पिकांवरची कीड कमी होते. या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जातो.
दिवसेंदिवस चिमण्यांचा चिवचिवाट कमी होत आहे, त्याचे अनेक कारणे आहेत. त्या मधले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पाणी न मिळणे , मोबाईल मुळे होणाºया रेडिएशनमुळे पक्षाला पाण्याची नितांत आवश्यकता असते . आता बागायती शेती कमी झाल्यामुळे आपल्या इकडचे धरण कालवे इत्यादी प्रकल्प नसल्यामुळे पक्षांची चीव चीव , कोकीळेची कुहु -कुहु  कमी दिसुन येते
सदर उपक्रम चंद्रकांत ठाकरे यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. विनोद भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम.डी. कुळकर्णी व डॉ. शिंदे यांनी राबविला. या प्रकल्पाकरिता विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग लाभला. यामध्ये पन्नास पाण्याचे मडके व दहा घरटे महाविद्यालयात लावण्यात आले.या प्रकल्पाकरिता ओम गाजरे, तुषार सोनोने,वैभव चौधरी, शुभम ठाकरे, गौरी कातखेडे ,अंकिता महाकाळ, पूनम चव्हाण ,पूर्वा गावंडे,हर्षा पोफळे, वृषाली ठाकरे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Nest and water management project for birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.