नवे जुने एकाच दरात: सोयाबीन दराबाबत शेतकऱ्यांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:19+5:302021-09-21T04:47:19+5:30
०००००००००००००० दरावर परिणाम कशाचा गेल्या वर्षी ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, चीनसारख्या सायोबीन उत्पादक देशात या पिकाचे उत्पादन घटल्याने मागणीत वाढ ...
००००००००००००००
दरावर परिणाम कशाचा
गेल्या वर्षी ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, चीनसारख्या सायोबीन उत्पादक देशात या पिकाचे उत्पादन घटल्याने मागणीत वाढ झाली होती, तर अद्यापही नव्या सोयाबीनची फारशी आवक बाजारात नाही. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर नेमका कशाचा परिणाम झाला, हे कळणे कठीण झाले आहे.
-------------------
कोट: मागील हंगामात सोयाबीनचा दर्जा घसरूनही चांगले दर मिळाले. त्यामुळे यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. आता नवे सोयाबीन बाजारात येत असतानाच, जुन्या सोयाबीनचेही दर घसरू लागले आहेत. त्यामुळे मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
- ज्ञानेश्वर शिंदे, शेतकरी.
०००००००००००००००
कोट: सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने, यंदा सोयाबीनवर अधिक भर दिला. आता हे पीक काढणीवर आले असतानाच, सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असून, जुन्या सोयाबीनसह नवे सोयाबीन एकाच दरात खरेदी केले जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
- रामराव बारडे, शेतकरी.