नवीन नियमावलीमुळे मानोऱ्यात उडाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:12+5:302021-04-20T04:42:12+5:30
मानोरा : सोमवार,१९ एप्रिलपासून वाशिम जिल्हाधिकारी यांनी नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार व्यापाऱ्यांना माहिती नसल्याने गोंधळ उडाला. काही दुकाने ...
मानोरा : सोमवार,१९ एप्रिलपासून वाशिम जिल्हाधिकारी यांनी नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार व्यापाऱ्यांना माहिती नसल्याने गोंधळ उडाला. काही दुकाने दुपारी १ वाजेनंतरही सुरूच असल्याचे दिसून आले.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश असताना काही दुकानदार यांनी आपली दुकाने सुरूच ठेवली असल्याने नगरपंचायतच्यावतीने त्यांचे साहित्य जप्त करून समज देण्यात आली.
अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये लोकांनी गर्दी केली होती तर स्टेट बँकचे पाच कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने तेथे कर्मचारी नाहीत. परिणामी येथे शुकशुकाट होता अनेकांना वेळ माहीत नसल्याने गोंधळ उडाला होता. आज मात्र शहरात गर्दी कमी असल्याचे दिसून आले.
कोट बॉक्स
आजपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. काही किरकोळ व्यापाऱ्यांना वेळ माहीत नाही. त्यांना सूचना दिल्या आहेत. काही फळविक्रेत्यांच्या वस्तू व अन्य साहित्य कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहे. त्या परत केले जाईल. सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले तरच आपण कोरोनाला हरवू.
नीलेश गायकवाड
मुख्याधिकारी, न,प,मानोरा