अखेर खंडाळा वीज उपकेंद्रासाठी नवे ट्रान्सफॉर्मर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:29 PM2018-10-29T18:29:36+5:302018-10-29T18:29:58+5:30
शिरपूर जैन (वाशिम): खंडाळा विज उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे स्थलांतरित करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): खंडाळा विज उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसह रिसोड-मालेगावचे आमदार अमित झनक यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला, तर लोकमतनेही शेतकºयांच्या समस्यांबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करून महावितरणचे लक्ष वेधले. याची दखल घेऊन अखेर सोमवार २९ आॅक्टोबर रोजी खंडाळा वीज उपकेंद्रासाठी नवे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करण्यात आले.
उर्जा राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या खंडाळा वीज उपकेंद्रात ५ एमव्हीएचे ट्रान्सफॉर्मर कार्यरत होते. मागील महिन्यात त्यापैकी एक ट्रान्सफॉर्मर लोड नसल्याचे कारण सांगून कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील वीज उपकेंद्रांत हलविण्यात आले. त्यामुळे शिरपूर व खंडाळा उपकेंद्र अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना सिंचनासाठी विज मिळत नव्हती. यासाठी विविध संघटना व शेतकºयांनी सतत विरोध अधिकाºयांना सुद्धा घेराव घातला. याप्रकरणी स्थानिक आमदार अमित झनक यांनीही कार्यकर्त्यासह वाशिम येथे अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला. त्यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी दहा ते पंधरा दिवसात नवीन ट्रांसफार्मर खंडाळा उपकेंद्रात करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, लोकमतनेही याबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकºयांच्या समस्यांकडे महावितरणचे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन २९ आॅक्टोबर रोजी खंडाळा उपकेंद्रात नवे ५ एमव्हीएचे ट्रान्सफॉर्मर महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आले. हे ट्रान्सफॉर्मर येत्या दोन दिवसांत कार्यान्वित केले जाणार आहे. यामुळे खंडाळा वीज उपकें द्रांत शेतकºयांची वीज पुरवठ्याची समस्या सुटणार आहे.