नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:58 AM2020-12-16T11:58:57+5:302020-12-16T12:01:14+5:30

MSEDCL NEWS अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

New Transformer not available even after 10 days; The farmers were annoyed | नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

Next
ठळक मुद्देसद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत.तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : यंदा प्रकल्प, धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे; परंतु विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने आणि बदलून मिळण्यास १०-१० दिवसांचा कालावधी लागत असल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे.
यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रकल्प, धरणांमध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत. यामध्ये ३३ केव्हीएचे २५, १०० केव्हीएचे ४१ आणि १६ केव्हीएच्या १०३ रोहित्रांचा समावेश आहे. रोहित्र बदलून मिळावे याकरिता शेतकरी हे लाइनमन व कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून ‘फेलिअर रिपोर्ट’ महावितरणच्या संबंधित कार्यालयात सादर करतात. अनेक ठिकाणी १०-१० दिवस रोहित्र बदलून मिळत नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे.
तक्रार करूनही प्रतीक्षेतच 
रोहित्र नादुरुस्त, बंद पडल्यानंतर लाइनमन किंवा कनिष्ठ अभियंत्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार केली जाते. फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरही १०, १० दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.


शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसान
सिंचन करण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था नाही. रोहित्र जळाल्यानंतर १५-१५ दिवस सिंचन करता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून उत्पादनात घट येण्याची भीती शेतकरी वर्तवित आहेत.


विद्युत रोहित्र बंद किंवा नादुरूस्त असल्याची तक्रार आणि फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर विद्युत रोहित्र बदलून दिले जात आहे. सद्यस्थितीत १६९ रोहित्र नादुरूस्त असून, ते बदलून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
- आर.जे. तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण


यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. आता सर्व भिस्त रब्बी हंगामावर आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर १०-१० दिवस बदलून दिले जात नाही.
- गाैतम भगत, शेतकरी

Web Title: New Transformer not available even after 10 days; The farmers were annoyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.