जिल्ह्यात नव्याने आढळले ६२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:31+5:302021-02-23T05:02:31+5:30
सोमवारी नव्याने आढळलेल्या ६२ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाशिम शहरातील सिव्हिल लाइन्स, आययूडीपी कॉलनी, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, इंगोले ले-आऊट, शुक्रवार पेठ, ...
सोमवारी नव्याने आढळलेल्या ६२ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाशिम शहरातील सिव्हिल लाइन्स, आययूडीपी कॉलनी, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, इंगोले ले-आऊट, शुक्रवार पेठ, लाखाळा, तिरुपती सिटी परिसर, पंचाळा येथील प्रत्येकी एक, वाल्मीकीनगर येथील ४, पार्डी येथील २, मालेगाव शहरात १; तर तालुक्यातील कुराळा येथे २, रिसोड तालुक्यात शहरासह मोप, वनोजा येथील प्रत्येक एक आणि मांगुळ झनक येथे १३, मानोरा तालुक्यात शहरातील ८, कुपटा, सावरगाव येथील प्रत्येकी एक, कारंजा शहरातील वाल्मीकीनगर, गवळीपुरा, यशोदानगर, नवीपुरा, बंजारा कॉलनी, महसूल कॉलनी, गांधी चौक परिसर, अकोला अर्बन बँक परिसर, प्रियदर्शनी कॉलनी परिसर, रहाटी, आंबोला, धामणी खडी, धोत्रा येथील प्रत्येकी एक व्यक्ती; तर धनज येथील ४ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील एका कोरोनाबाधिताचीही नोंद झाली आहे. तसेच सोमवारी प्रकृती बरी झाल्याने २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
....................
बॉक्स :
३५७ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता ७ हजार ८३५ वर पोहोचला आहे. त्यापैकी ७ हजार १४१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
.................
कोरोना सद्य:स्थिती
एकूण बाधित - ७,८३५
अॅक्टिव्ह रुग्ण - ५३७
डिस्चार्ज - ७,१४१
मृत्यू - १५६