मालेगाव तालुक्यातील १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:18 PM2018-03-13T15:18:00+5:302018-03-13T15:18:00+5:30

​​​​​​​शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, उर्वरीत प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. अनेक गावांत विहिर, बोअरवेल, हातपंपही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य भीषणतेने नागरिकांची झोप उडत आहे.

Nil water storage in 14 projects in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यातील १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा

मालेगाव तालुक्यातील १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने आता मालेगाव तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे.बोरगाव, ब्राह्मणवाडा, डव्हा, कळंबेश्वर, कोल्ही, कुºहळा, मालेगाव, मसला खुर्द, मुंगळा, रिधोरा, सोमठाणा, खडकी, उर्ध्व मोर्णा, मैराळडोह अशा एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा आहे. सोनखास प्रकल्पात ३१ टक्के, सुकांडा १३ टक्के, सुदी १३ टक्के, चाकातिर्थ १८ टक्के, धारापिंप्री १९ टक्के, कुत्तरडोह २४ टक्के असा जलसाठा आहे.

शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, उर्वरीत प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. अनेक गावांत विहिर, बोअरवेल, हातपंपही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य भीषणतेने नागरिकांची झोप उडत आहे.

गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने आता मालेगाव तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्यामुळे प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. तालुक्यातील बोरगाव, ब्राह्मणवाडा, डव्हा, कळंबेश्वर, कोल्ही, कुºहळा, मालेगाव, मसला खुर्द, मुंगळा, रिधोरा, सोमठाणा, खडकी, उर्ध्व मोर्णा, मैराळडोह अशा एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा आहे. सोनखास प्रकल्पात ३१ टक्के, सुकांडा १३ टक्के, सुदी १३ टक्के, चाकातिर्थ १८ टक्के, धारापिंप्री १९ टक्के, कुत्तरडोह २४ टक्के असा जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यात या प्रकल्पांत सरासरी ८ टक्के जलसाठा आहे.

काही गावांत पाणीटंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. विहिरी, हातपंप कोरडे पडत असल्याने शेतातील विहिरींवरून पाणी आणण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. नळ पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती, तात्पुरती नळ योजना, विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा, पाणीपुरवठा योजनांचे पुनरूज्जीवन आदी उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करणे अपेक्षीत आहे.

Web Title: Nil water storage in 14 projects in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.