नऊच दिवसांत १४ प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:10+5:302021-06-19T04:27:10+5:30
जिल्ह्यात एकबुर्जी (वाशिम), सोनल (मालेगाव) आणि अडाण (कारंजा) हे तीन मध्यम प्रकल्प असून वाशिम तालुक्यात २१, मालेगाव १४, कारंजा ...
जिल्ह्यात एकबुर्जी (वाशिम), सोनल (मालेगाव) आणि अडाण (कारंजा) हे तीन मध्यम प्रकल्प असून वाशिम तालुक्यात २१, मालेगाव १४, कारंजा ११, मंगरूळपीर ९, रिसोड ९ आणि मानोरा तालुक्यात ६ असे एकूण ७० लघुप्रकल्प वसलेले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. १० टक्क्यांपर्यंत भरलेल्या प्रकल्पांची संख्या ९ असून १० ते २५ टक्क्यांपर्यंत १४, २५ ते ५० टक्क्यांपर्यंत १४ आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेल्या प्रकल्पांची संख्या दोन आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अल्पावधीतच तुडुंब होतील, असे संकेत वर्तविण्यात येत आहेत.
.....................
अडाणमध्ये ४४, एकबुर्जीत ३२ टक्के पाणीसाठा
कारंजा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पात सध्या ४४ टक्के पाणीसाठा झाला असून वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीतही वाढ होत पाणीसाठा ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पात सध्या २९ टक्के पाणीसाठा आहे.
....................
तालुकानिहाय लघु प्रकल्पांचा पाणीसाठा
वाशिम - ४.९९ टक्के
मालेगाव - २६.२४ टक्के
कारंजा - ४०.५९ टक्के
मंगरुळपीर - ७.३८ टक्के
रिसोड - ११.४२ टक्के
मानोरा - २०.१५ टक्के