तीन तालुके कोरोनाबाबत निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:36+5:302021-07-14T04:46:36+5:30
............. वाहतूक ठप्प, वाहनांची रांग वाशिम : शहरातून गेलेल्या अकोला-नांदेड महामार्गावर दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. असाच प्रकार ...
.............
वाहतूक ठप्प, वाहनांची रांग
वाशिम : शहरातून गेलेल्या अकोला-नांदेड महामार्गावर दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. असाच प्रकार सोमवारी दुपारच्या सुमारास घडला. यावेळी वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे पाहावयास मिळाले.
................
विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात खरीप पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत त्यात सहभाग निश्चित करून विमा हप्ता भरावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.
................
तणनाशक फवारणी कामास वेग
वाशिम : दोन दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने सोमवारी उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणीच्या कामास वेग दिला असून खताची मात्रा देण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
..............
जऊळका येथे एक रुग्ण आढळला
जऊळका रेल्वे : जऊळका गावासह परिसरात इतर ठिकाणी गेल्या काही दिवसात कोरोनाचे संकट निवळत चालल्याचे दिसत आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार केवळ एक रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले.
...................
दुचाकी वाहन तपासणीला ‘ब्रेक’
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहन तपासणीला पोलिसांकडून ‘ब्रेक’ देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे. मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
.............
गाजर गवत निर्मूलनाची मागणी
अनसिंग : पावसाळ्याचे दिवस सुरू असून गाव परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगविले आहे. याकडे ग्रा.पं.ने लक्ष पुरवून गाजर गवत निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
...............
रस्ते डागडुजीकडे न.पं.चे दुर्लक्ष
वाशिम : शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही आजमितीस दुरवस्था झाली आहे. पाऊस झाल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचून गैरसोय होत आहे. असे असताना डागडुजीकडे न.पं.ने दुर्लक्ष केले आहे.
.............
बंद असलेल्या शाळा सुरू होण्याचे संकेत
वाशिम : येत्या १५ जुलैपासून जिल्ह्यातील काही शाळा सुरू होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांच्या साफसफाईची कामे सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.
.................
चार वाजताच बंद होतात दुकाने
मालेगाव : ‘डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरियंट’च्या संभाव्य धोक्यामुळे १२ जुलैपासून निर्बंध लागू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली. चार वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश असून त्याचे पालन केले जात असल्याचे पाहावयास मिळाले.
..............
महसूलच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण
वाशिम : दोन वर्षांपूर्वी शेलू बाजारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या महसूलच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते ; मात्र हा प्रश्न पुन्हा ‘जैसे थे’ झाला असून पूर्वीप्रमाणेच अतिक्रमण वाढले आहे.
..............
आठ दिवसांत मिळाले ३८ हजार डोस
वाशिम : जिल्ह्यात ५ जुलैपासून लसीकरण मोहिमेस वेग देण्यात आला. तेव्हापासून १२ जुलैपर्यंत ३८ हजार ५६२ डोस उपलब्ध झाले. यामुळे आरोग्य विभागास मोहीम राबविताना अडथळा जाणवला नाही.
...............
बालकामगार शोध मोहीम वेगात
वाशिम : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून बालकामगार शोध मोहीम वेगात राबविली जात आहे. काही दिवसांपूर्वी कारंजात बालकामगार कामावर ठेवल्याप्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली.