चिडीमारी रोखण्यासाठी ‘निर्भया पथक’ पुन्हा सक्रिय

By admin | Published: August 25, 2015 02:30 AM2015-08-25T02:30:03+5:302015-08-25T02:30:03+5:30

निर्भया पथकाच्या वाहनाला भावना गवळी यांनी दाखवली हिरवी झेंडी.

'Nirbhaya Squad' again active to prevent chimney sweep | चिडीमारी रोखण्यासाठी ‘निर्भया पथक’ पुन्हा सक्रिय

चिडीमारी रोखण्यासाठी ‘निर्भया पथक’ पुन्हा सक्रिय

Next

वाशिम : येथील शाळा, महाविद्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारी युवती, तसेच महिला यांची छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांचे निर्भया पथक पुन्हा एकदा नव्याने तयार करण्यात आले आहे. या निर्भया पथकाच्या वाहनाला खासदार भावना गवळी यांनी हिरवी झेंडी दाखवून कार्यास प्रारंभ केला आहे. निर्भया पथक हे शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा ठिकाणी जाऊन मुलींची छेड काढणार्‍यांवर बारीक लक्ष ठेवणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थींनींना त्रास देणार्‍या मुलांना सर्वप्रथम समज दिली जाईल. ते ऐकत नसतील, तर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या पथकामुळे महिलांच्या छेडछाडीला काही प्रमाणात आळा बसणार असल्याचा विश्‍वास पोलिस अधिक्षक विनिता साहु यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस उपअधिक्षक (गृह) संग्राम सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक डी.बी. तडवी, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र देशमुख, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 'Nirbhaya Squad' again active to prevent chimney sweep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.