निजामपूर स्मशानभूमीचे लोकसहभागातून होणार सुशोभिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:45+5:302021-02-15T04:35:45+5:30

रिसोड : तालुक्यातील निजामपूर येथील स्मशानभूमीचे लोकसहभागातून सुशोभिकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम ...

Nizampur cemetery will be beautified through public participation | निजामपूर स्मशानभूमीचे लोकसहभागातून होणार सुशोभिकरण

निजामपूर स्मशानभूमीचे लोकसहभागातून होणार सुशोभिकरण

Next

रिसोड : तालुक्यातील निजामपूर येथील स्मशानभूमीचे लोकसहभागातून सुशोभिकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अजित शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यासह निजामपूर व रिसोड शहरातील नागरिक उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून दुर्लक्षित स्मशानभूमीचे सुशोभिकरण करण्यासाठी निजामपूर व रिसोड शहरातील नागरिक सरसावले आहेत. या कामाकरिता लोकसहभागातून २५ लाख रुपयांची वर्गणी जमा करणार असल्याची माहिती निजामपूर स्मशानभूमी सुशोभिकरण समितीचे सदस्य तथा सरपंच डिगांबर जाधव यांनी दिली.

स्मशानभूमीच्या सुशोभिकरण कामामध्ये तारेचे कंपाऊंड करणे, अंतर्गत रस्ते, वृक्षारोपण, नागरिकांना बसण्याकरिता आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी अत्यावश्यक सुविधांचा समावेश आहे. या कामासाठी लागणारा निधी निजामपूर आणि रिसोड शहरातील नागरिक लोकसहभागातून गोळा करत आहेत. आजपर्यंत १५ लाख रुपयांची वर्गणी जमा झाली आहे. या कामावर देखरेखीकरिता १० सदस्यांची समिती तयार करण्यात आली असून, या समितीकडे सुशोभिकरणाच्या कामाचा लेखाजोखा राहणार आहे.

या कार्यक्रमाला रामकिसन दवंड, बबनराव मोरे, दीपक सोनुने, बबन सुरूशे, विनोद परबत, कपिल पाटील कदम, नारायण गायकवाड, पवन छित्तरका, सुभाष चोपडे, सदाशिव चौधरी, प्रल्हाद गायकवाड, सोनाजी करे, हरिभाऊ दवड, गोपाल जाधव, विठ्ठल दरुगे, प्रल्हाद दवंड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक अर्जुन वरघट यांनी केले.

Web Title: Nizampur cemetery will be beautified through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.