निजामपूरच्या जि. प. शाळेची यशोगाथा राज्यात झळकणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:32+5:302021-08-02T04:15:32+5:30

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबादच्या संकल्पनेतून उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन मिळावे व राज्यातील इतर ...

Nizampur district. W. School success story to shine in the state! | निजामपूरच्या जि. प. शाळेची यशोगाथा राज्यात झळकणार !

निजामपूरच्या जि. प. शाळेची यशोगाथा राज्यात झळकणार !

Next

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबादच्या संकल्पनेतून उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन मिळावे व राज्यातील इतर शाळांसमोर आदर्श निर्माण व्हावा, याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन शाळांची निवड करण्यात आली. लोकसहभागातून शाळेला नवसंजीवनी देणाऱ्या व शंभर टक्के डिजिटल होणाऱ्या शाळा, नवोपक्रम राबविणाऱ्या शाळा, जीवन जगण्याची कला व विद्यार्थ्यांमध्ये नैतिकमूल्य रुजविणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिपा’द्वारा प्रेरणादायी संकल्पना राबविण्यात आली. त्यात जि. प. शाळा, निजामपूरची यशोगाथा राज्यस्तरावर प्रकाशित होणाऱ्या पुस्तिकेत होणार आहे. ही बाब तालुका व जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरली आहे. याकामी रिसोड पं. स.चे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, केंद्रप्रमुख सरस्वती लोंढे, संतोष भिसडे, सरपंच डिगांबर जाधव, अध्यक्ष विठ्ठल दरुगे यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती मुख्याध्यापक अर्जुन वरघट, मंजूषा काळे, प्रज्ञा उपाध्ये, पुष्पा संबळे, धीरज जाधव यांनी दिली.

........................

दुसऱ्यांदा मिळाला बहुमान

यापूर्वी निजामपूर येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन वरघट यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शाळेच्या उत्कर्षासाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावातील नागरिकांनी केलेले सहकार्य, ग्रामपंचायतकडून मिळालेली आर्थिक मदत मोलाची ठरली आणि शाळेला दुसऱ्यांना बहुमान प्राप्त झाला.

Web Title: Nizampur district. W. School success story to shine in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.