पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:57 AM2017-08-23T00:57:24+5:302017-08-23T00:57:31+5:30
वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २0१७ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २0१७ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्याकडे उमेदवारास किंवा त्यांच्या सुचकास २२ ते २८ ऑगस्ट २0१७ रोजी (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपयर्ंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. जसजशी नामनिर्देशनपत्रे प्राप्त होतील, त्याप्रमाणे नोटिस बोर्डवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रांचे नमुने अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. २९ ऑगस्ट २0१७ रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर त्याचदिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाविषयी ३१ ऑगस्ट २0१७ पयर्ंत जिल्हाधिकार्यांकडे अपील करता येणार आहे.
१ सप्टेंबर २0१७ पयर्ंत जिल्हाधिकारी यांच्याकडील अंतिम निर्णय होईल. अपिलांतर वैध उमेदवारी अर्जाची यादी ४ सप्टेंबर २0१७ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पयर्ंत आहे. ५ सप्टेंबर २0१७ रोजी सायंकाळी ४ वाजता निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यकता असल्यास १४ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपयर्ंत मतदान घेतले जाईल. १५ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी १0 वा. पासून मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर लगेच निकाल घोषित केला जाणार आहे, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.
लहान नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री, सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री असे एकूण तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदान करण्यास पात्र असणार आहेत. अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
-