दुसर्या दिवशीही उमेदवारी अर्ज नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:06 AM2017-08-24T01:06:46+5:302017-08-24T01:06:46+5:30
वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आज दुसर्या दिवशी अर्थात २३ ऑगस्ट रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. चार उमेदवारी अर्ज नेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्याकडे उमेदवारास किंवा त्यांच्या सुचकास २८ ऑगस्टपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपयर्ंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी अर्जाची छाननी आणि छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध होणार आहे. ५ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपयर्ंत मतदान होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजतापासून मतमोजणीस सुरुवात होईल. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदार करण्यास पात्र असून, त्या दृष्टिने फिल्डिंग लावली जात आहे. २३ ऑगस्टपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.