आरटीपीसीआर प्रयोगशाळेत महत्त्वाच्या पदासाठी उमेदवार मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:27 PM2020-10-03T12:27:31+5:302020-10-03T12:27:39+5:30

CoronaVirus News Washim तंत्रज्ञ आणि सहाय्यकांची पदे भरली, तरी महत्त्वाच्या पदासाठी उमेदवारच आले नाहीत.

No candidate for important post in RTPCR laboratory! | आरटीपीसीआर प्रयोगशाळेत महत्त्वाच्या पदासाठी उमेदवार मिळेना!

आरटीपीसीआर प्रयोगशाळेत महत्त्वाच्या पदासाठी उमेदवार मिळेना!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता संदिग्धांची वेळेत तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे व्हावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर करून घेतली. या प्रयोगशाळेत आवश्यक पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी मुलाखती पार पडल्या. त्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यकांची पदे भरली, तरी महत्त्वाच्या पदासाठी उमेदवारच आले नाहीत.
आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. कोरोनाबाधितांची संख्या पाहता पाहता हजार, दोन, हजारांच्या पार झाली आणि आता ती चार हजारांच्यावर गेली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असतानाच संदिग्धांचे चाचणी अहवाल मिळण्यास मोठा विलंब होत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे आणि इतर संदिग्धांचा वेळेत शोध घेणे कठीण झाले होते. तपासणीसाठी संदिग्धांचे नमुने परजिल्ह्यात पाठवावे लागत असल्याने हा प्रकार घडत आहे. ही बाब लक्षात घेत जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन कोरोना चाचणी जिल्ह्यातच होण्यासाठी प्रयोगशाळा उभारणीची मागणी केली. पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणीस मंजुरीही देण्यात आली. प्रयोगशाळेसाठी जागाही निश्चित करण्यात आली. ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी जिल्हाप्रशासन आणि आरोग्य विभागाकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात तीन प्रयोशाळा तंत्रज्ञ आणि सहा प्रयोग्शाळा सहाय्यकांची पदे भरल्या गेली; परंतु महत्त्वाच्या एमड मायक्र ो बॉयोलॉजी आणि एमडी पॅथॉलॉजी या पदासाठी उमेदवाराच मिळू शकले नाहीत.

Web Title: No candidate for important post in RTPCR laboratory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.