नवीन रेशनवर धान्य पुरवठा नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:16 AM2021-02-18T05:16:27+5:302021-02-18T05:16:27+5:30

000 उंबर्डाबाजार येथे आरोग्य तपासणी उंबर्डाबाजार : येथील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला असून, ...

No grain supply on new rations! | नवीन रेशनवर धान्य पुरवठा नाही !

नवीन रेशनवर धान्य पुरवठा नाही !

googlenewsNext

000

उंबर्डाबाजार येथे आरोग्य तपासणी

उंबर्डाबाजार : येथील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली आहे. परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

००००००

शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी

केनवड : कोरोनामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण सात महिने बंद होते. त्यामुळे शैक्षणिक शुल्क पूर्णपणे वसूल न करता सवलत देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी शिक्षण विभागाकडे बुधवारी केली.

००००००

कामरगाव येथे एक कोरोना रुग्ण

कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील एकाचा कोरोना चाचणी अहवाल १६ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा धोका अजून संपलेला नसल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने बुधवारी केले.

०००००००००

आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शन

धनज : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत आरोग्य विभागातर्फे मंगळवारी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. धनज येथे १६ फेब्रुवारी रोजी एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

००००००००

ग्रामपंचायत भवनसाठी निधीची प्रतीक्षा

रिठद : प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र इमारत (भवन) असणे गरजेचे आहे. रिठद जिल्हा परिषद गटातील काही ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही. ग्रामपंचायत भवनसाठी शासनाकडून निधी केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: No grain supply on new rations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.