लायसन्स नाही; दंड भरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:07+5:302021-09-19T04:42:07+5:30
००००००००००००० बालविवाहासंबंधी माहिती द्या ! वाशिम : जिल्ह्यात २०२१ मध्ये काही बालविवाह रोखले आहेत. यापुढेही जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत ...
०००००००००००००
बालविवाहासंबंधी माहिती द्या !
वाशिम : जिल्ह्यात २०२१ मध्ये काही बालविवाह रोखले आहेत. यापुढेही जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने शनिवारी केले.
०००००
ऑनलाईन शिक्षण असतानाही भरमसाठ फी वसुली
वाशिम : जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. ऑनलाईन पद्धतीने शाळा असल्या, तरी नावापुरती कपात करून विद्यार्थ्यांकडून नियमित शाळेप्रमाणेच भरमसाठ फी घेतली जात आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
०००००
कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट कमी झाले आहे. शनिवारी तर एकही बाधित आढळून आला नाही. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण लक्षणीय घटल्याचे दिसून येत आहे.