आठवडी बाजारात ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:41+5:302021-06-18T04:28:41+5:30
वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ या काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. या लाटेत ३२ हजारांहून अधिक लोकांना ...
वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ या काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. या लाटेत ३२ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला, तर ४२४ लोकांचा या काळात कोरोनामुळे मृत्यूही झाला. आता मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासन निकषानुसार वाशिम जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. सर्व प्रतिष्ठाने, दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहेत. त्यात आठवडी बाजारांचाही समावेश आहे. आठवडी बाजारात उसळणारी ग्राहकांची गर्दी लक्षात घेता, या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यात गत चार दिवसांत भरविण्यात आलेल्या बाजारात मात्र याचे भान ग्राहक, विक्रेत्यांना नसल्याचे दिसून आले. त्यात इंझोरी येथे नियोजित जागा सोडून गावच्या रस्त्यावर भरविण्यात आला. येथे फारशी गर्दी दिसली नाही; परंतु मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगची काळजी घेतली नसल्याचे दिसले.
२) इंझोरीचा आठवडी बाजार
अ) ना मास्क
इंझोरी येथे गुरुवारी आठवडी बाजार भरविण्यात आला. कोरोना संसर्गाचा विचार करता ग्राहक, विक्रेत्यांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करणे आवश्यक होते; परंतु केवळ १० ते १५ टक्के लोकच मास्क लावून बाजारात वावरत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.
----------
ब) ना फिजिकल डिस्टन्सिंग
कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते; परंतु इंझोरीच्या आठवडी बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे काही दुकानांवर दिसले.
--------------
क) कोरोनाची भीतीही नाही...
इंझोरी येथे गुरुवारी भरविला जाणारा आठवडी बाजार नियोजित जागासोडून गावाच्या मुख्य रस्त्यावर भरविण्यात आला. बाजारातील गर्दी टाळून कोरोना संसर्गाला वाव मिळू नये, यासाठीच हा पर्याय ठेवला असावा; परंतु या आठवडी बाजारात कोणालाही कोरोना संसर्गाची भीती वाटत असल्याचे दिसले नाही.
-------------
ड) विक्रेतेही बेफिकीर
इंझोरीच्या बाजारात वाशिम जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यांतील अनेक विक्रेते विविध वस्तू, भाजीपाला, धान्य विकण्यासाठी येतात. त्यांनी मास्कचा वापर करून ग्राहकांत फिजिकल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक होते; परंतु विक्रेतेही बेफिकीर असल्याचे या ठिकाणी दिसून आले.
---------
३) अधिकाऱ्याचा कोट
कोट: इंझोरी येथे भरविल्या जाणाऱ्या आठवडी बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व मास्कचा वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्तर समितीने दक्षता बाळगणे आणि तसे आवाहन विक्रेते व ग्राहकांना करणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणाची जबाबदारी ही प्रत्येकाची असल्याने नागरिकांनीही भान ठेवायला हवे.
-शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
===Photopath===
170621\17wsm_1_17062021_35.jpg
===Caption===
आठवडी बाजारात ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’