ना शाळा, ना परीक्षा; तरीही २.४३ लाख विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:28+5:302021-06-22T04:27:28+5:30

वाशिम : गतवर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनामुळे ...

No school, no exams; Still 2.43 lakh students pass! | ना शाळा, ना परीक्षा; तरीही २.४३ लाख विद्यार्थी पास !

ना शाळा, ना परीक्षा; तरीही २.४३ लाख विद्यार्थी पास !

Next

वाशिम : गतवर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनामुळे परीक्षा न घेताच, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिली ते बारावीचे २ लाख ४३ हजार ४८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था प्रभावित झालेली आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेणे शक्य नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी पहिली ते नववीच्या तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या. गतवर्षी कोरोनाच्या कारणामुळे पहिली ते चवथीचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन करता आले नाही त्यांना आरटीई कायद्याच्या कलम १६नुसार पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात येणार आहे. राज्यात पाचवी ते आठवीच्या शाळा १५ दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या, तर अनेक ठिकाणी पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. अशा विद्यार्थ्यांचे शाळांकडून संकलित मूल्यमापन करण्यात आले आहे.

०००००००

ऑनलाइन शिक्षण..

फायदे

कोरोनामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंद होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले.

यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात फारसा खंड पडला नाही. अभ्यास करण्याची सवय कायम राहिली.

ऑनलाइन पद्धतीने घटक चाचणी, सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची उजळणी घेतली. विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा वॉच राहिला.

.......

तोटे

ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात पोहचले नाही.

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल, टॅब आल्याने विद्यार्थ्यांना मोबाइलचे व्यसन जडले. अनेक विद्यार्थी मोबाइलवर तासनतास असल्याने डोळ्यांच्या समस्या तसेच डोकेदुखी वाढली. मुलांमध्ये चिडचिड, मानसिक समस्यादेखील निर्माण झाल्या. अभ्यास सोडून मुले मोबाइलमध्ये विविध प्रकारचे गेम खेळू लागले.

०००००००

शहरे

शहरी भागातील मुलांना ऑनलाइन शिक्षण सहज उपलब्ध झाले. मोबाइल, टॅब, लॅपटॉप असल्याने शहरी भागात ऑनलाइन शिक्षणात फारसा व्यत्यय निर्माण झाला नाही. निर्बंधाच्या काळात पालकांनीदेखील मुलांचा ऑनलाइन गृहपाठ, अभ्यास करून घेतला. शहरी भागातील मुलांचा ऑनलाइन शिक्षणाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.

.............

खेडेगाव..

खेडेगावातील अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, टॅब नाहीत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षणात सामावून घेताना अडचणी आल्या.

अनेक गावात नेट कनेक्टिव्हिटी तसेच रेंज नसल्याने ऑनलाइन शिक्षण सलग देता आले नाही. शहरी भागाच्या तुलनेत खेडेगावात ऑनलाइन शिक्षण फारसे प्रभावी ठरले नाही.

000000000000000000000000000000000

जि.प. शाळा - ८१३

खासगी अनुदानित शाळा - १८४

खासगी विनाअनुदानित शाळा - ४२२

०००००००

एकूण विद्यार्थी -

पहिली विद्यार्थी १९,६९०

दुसरी विद्यार्थी २०,१९८

तिसरी विद्यार्थी १९,६९८

चवथी विद्यार्थी २१,१७७

पाचवी विद्यार्थी २१,०५२

सहावी विद्यार्थी २१,१३६

सातवी विद्यार्थी २१,४३६

आठवी विद्यार्थी २१,५००

नववी विद्यार्थी २०,७००

दहावी विद्यार्थी १९,७१५

अकरावी विद्यार्थी १९,००५

बारावी विद्यार्थी १८,१७५

Web Title: No school, no exams; Still 2.43 lakh students pass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.