आठ दिवसांपासून तळप, रामतिर्थ गावाचा पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:48 PM2018-07-18T12:48:57+5:302018-07-18T12:50:55+5:30

मानोरा  : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे.

no water supply in villages For eight days | आठ दिवसांपासून तळप, रामतिर्थ गावाचा पाणी पुरवठा बंद

आठ दिवसांपासून तळप, रामतिर्थ गावाचा पाणी पुरवठा बंद

Next
ठळक मुद्देलाखो रुपये  खर्च करुन मजीप्राची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली.रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते, परंतु आठ दिवस उलटुनही  पाणी पुरवठा सुरु झाला नाही. 


लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे.
धरणावरील विद्युत रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे समजते, परंतु आठ दिवस उलटुनही संंबंधीत विभागाकडुन पाणी पुरवठा पुर्ववत करण्याबाबत कारवाई केल्या जात नाही. त्यामुळे सदरहुन योजना रामभरोसे असल्याचे दिसुन येते. 
तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या निकाली काढण्याच्या उद्देशाने लाखो रुपये  खर्च करुन मजीप्राची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. यामध्ये तळप बु व रामतिर्थ या गावाचा  समावेश आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येथील पाणी पुरवठा नेहमीच बंद राहतो. याबाबत तात्काळ कारवाई केल्या जात नाही. पाणी पुरवठा करणाºया धरणावरील विद्युत रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते, परंतु आठ दिवस उलटुनही  पाणी पुरवठा सुरु झाला नाही. 
 गंगाधर ढोेरे, सारखे कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे ही योजना अगदीच रामभरोसे  झाली आहे.कारंजा विभागातील अधिकारी कर्मचारीकरिता या योजनेचे देणे घेणे नसल्यासारखे वागत आहे. वरिष्ठांनी याबाबत लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सदरहु योजनेचा गावात पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा. 
- इंदुताई पाटील, सरपंच ग्रा.पं.तळप.

Web Title: no water supply in villages For eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.