ध्वनिप्रदूषण करणे महागात पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:14+5:302021-09-16T04:52:14+5:30
ध्वनिप्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, शहर पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर, ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक ...
ध्वनिप्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, शहर पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर, ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक झळके, रिसोडचे पोलीस निरीक्षक नवलकर, मालेगावचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ, शिरपूर पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, मंगरूळपीर पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, अनसिंगच्या सहायक पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, आसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल तायडे, जऊळकाचे सहायक पोलीस निरीक्षक आजिनाथ मोरे, कारंजाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन धंदर, मानोराचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासह जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण हे असून, गृहेशाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक डी.सी. खंडेराव हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सचिव आहेत. ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ वरही संपर्क साधू शकतात, असे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कळविले आहे.