पीक विमा योजनेकडे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 03:36 PM2019-07-01T15:36:47+5:302019-07-01T15:36:53+5:30
कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकºयांना तो ऐच्छिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सन २०१९-२० खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकºयांना तो ऐच्छिक आहे. कर्जदार बिगर कर्जदार शेतकºयांनी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २४ जुलै २०१९ आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. इतर तालुक्यातील शेतकºयांनी संबंधित पिकांचा विमा काढू नये. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाºया शेतकºयांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत.
या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्षे वगळून) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आहे, असे कळविण्यात आले.