तांडा वस्ती सुधार योजनेत बंजारा समाजाला अशासकीय पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:01+5:302021-08-13T04:47:01+5:30
तांडा,वस्ती आणि वाडी यांच्या विकासाकरिता करिता वसंतराव नाईक तांडा,वस्ती सुधार योजना समिती आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्याच्या ...
तांडा,वस्ती आणि वाडी यांच्या विकासाकरिता करिता वसंतराव नाईक तांडा,वस्ती सुधार योजना समिती आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्याच्या या समितीवर वि.जा.भ.ज.या प्रवर्गातून अशासकीय अध्यक्ष, सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत होती परंतु तत्कालीन भाजप सरकारने ३० जानेवारी २०१८ चे शासन निर्णयनुसार त्यामध्ये बद्दल करून जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष राहील असा निर्णय काढण्यात आला.
या निर्णयामुळे तांडा, वस्तीत पाहिजे त्या प्रमाणात सुधारणा होऊ शकली नाही. जिल्हाधिकारी हे आधीच १०८ समितीचे अध्यक्ष असल्याने, कामाच्या व्यस्ततेमुळे पाहिजे त्या प्रमाणात तांडा, वस्तीच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून पूर्वीप्रमाणेच अशासकीय अध्यक्ष, सदस्य म्हणून वि.जा.भ.ज. प्रवर्गातून नियुक्ती करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन महंत सुनील महाराज पोहरादेवी यांच्या नेतृत्वात बंजारा समाजाचे शिष्टमंडळ मंत्री विजय वडेट्टीवार (वि.जा.भ.ज.व ई. मा.व. मंत्री)यांची मुंबई येथे भेट घेऊन देण्यात आले हाेते. या शिष्टमंडळात प्रामुख्याने महंत सुनील महाराज,राजेश चव्हाण जालनेकर, ॲड. विशाल राठोड, प्रा.वसंत राठोड पुसद,नरेश राठोड मुंबई, मोहन जाधव यवतमाळ, शिवणी, अविनाश चव्हाण मांडवी,सुमित राठोड माहूर,रमेश जाधव बुलडाणा,श्रीकांत राठोड शेगी, जितेंद्र चव्हाण नागपूर हे उपस्थित होते. अतिशय तत्परतेने ना. वडेट्टीवार यांनी निर्णय घेऊन वि.जा.भ.जा. समाजातील लोकांना न्याय दिल्याबद्दल संपूर्ण समाज बांधवाकडून त्यांचे काैतुक केले जात आहे, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली.