देपूळ येथील शाळा समितीच्या गठणाला कोलदांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:52 PM2018-12-07T16:52:01+5:302018-12-07T16:53:07+5:30
देपूळ : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी ५ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे नियमानुसार गठण करण्याच्या सुचना दिल्यानंतर देपूळ येथील जि.प. शाळेत त्याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी ५ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे नियमानुसार गठण करण्याच्या सुचना दिल्यानंतर देपूळ येथील जि.प. शाळेत त्याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे पालकवर्गाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार करून या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.
पूर्वी ग्रामपंचायत सरपंच हे जि.प.शाळा व्यवस्थापन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असायचे; परंतु शाळेत गटबाजी व राजकारण वाढून त्याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवू लागला. यामुळे शाळेतून राजकारण हद्दपार करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने ८ वर्षांपूर्वी शाळा व्यवस्थापन समिती पालकामधूनच गठीत करण्याचे शासन परिपत्रक काढले. तेव्हापासून दोन वर्षे कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करणे सुरु झाले व ग्रामपंचायतचा हस्तक्षेप पूर्णपणे बंद झाला; परंतु देपूळ येथे या समितीच्या निवडीबाबत मतभेद निर्माण झाल्याने अडसर येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाºयांनी ५ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीस्तरावर पत्र पाठवून देपूळ येथे शाळा समिती गठीत करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर गत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी पालकसभाही बोलावण्यात आली; परंतु या सभेत दोन गटांत वाद निर्माण झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीचा विषय प्रलंबितच राहिला. यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालक सभेचे आयोजन करून शाळा व्यवस्थापन समितीची गठीत करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणीही केली; परंतु अद्याप पोलीस संरक्षणही देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार करून दखल घेण्याची मागणी केली आहे. या तक्रारीच्या प्रति विभागीय आयुक्त, शिक्षण मंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी पालकसभा बोलावली. त्यावेळी दोन गटांत वाद झाला. आता पुन्हा सभेचे आयोजन करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून, पोलीस संरक्षण मिळाल्यानंतरच पालकसभा घेऊन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येईल.
-सुरेश उगले
मुख्याध्यापक
जि.प. शाळा देपूळ