मास्क न घालणे महागात पडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:02+5:302021-09-02T05:29:02+5:30
००००००००००० अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम केव्हा? वाशिम : अनसिंग, रिठद, शिरपूर, मेडशी यासह अन्य जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी केंद्र इमारत ...
०००००००००००
अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम केव्हा?
वाशिम : अनसिंग, रिठद, शिरपूर, मेडशी यासह अन्य जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी केंद्र इमारत दुरुस्तीसाठी, नवीन इमारतीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडून निधी मिळाला. परंतु, बांधकाम पूर्ण केव्हा होणार? असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे.
००००००
वसारी-तिवळी रस्त्याची दुरवस्था
वाशिम : वसारी ते तिवळी रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यातच ब-याच ठिकाणी शेतक-यांनी रस्ता खोदून पाइपलाइन केली आहे; परंतु रस्ता जमिनीच्या स्तरापर्यंत बुजविला नाही. त्यामुळे वाहनचालक, बैलबंडी नेणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
००००००
अतिक्रमणाचे सर्वेक्षण केव्हा होणार?
वाशिम : रिसोड व मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. आता कोरोनाचा आलेख खाली आल्याने सर्वेक्षण करण्याची मागणी समोर आली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.
००००००
रोहित्र दुरुस्तीसाठी धडपड
वाशिम : विविध कारणांमुळे बिघाड झालेले रोहित्र दुरुस्त करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे. त्यात जिल्ह्यात आठवडाभराच्या कालावधित नादुरुस्त झालेल्या ४४ रोहित्रांपैकी ३५ रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहेत.
०००००००००००००
जि. प. शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्तच
वाशिम : शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गखोल्यांची दुरुस्ती तातडीने करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. तथापि, जिल्ह्यातील अनेक शाळांच्या वर्गखोल्यांसाठी निधी मिळूनही दुरुस्तीचे काम झाले नाही.
०००००००
ओबीसींना राजकीय आरक्षण द्या
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे.
००००
संगणक दुरुस्ती केव्हा होणार?
वाशिम : जिल्ह्यातील आपले संगणक सेवा केंद्रातील बहुतांश संगणक नादुरुस्त आहेत. यामुळे कागदपत्रे घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन संगणक दुरुस्ती करावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
०००००
लसीकरणाचा घेतला आढावा
वाशिम : ग्रामीण भागातही कोरोना प्रतिबंधक लसीची टक्केवारी वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सोमवारी तालुका आरोग्य अधिका-यांकडून आढावा घेतला.