‘त्या’ शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:25+5:302021-02-26T04:57:25+5:30
रिसाेड : येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विद्युत पुरवठा मिळवण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०१६ला कोटेशन स्वरुपात ५२०० रुपयांचा ...
रिसाेड : येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विद्युत पुरवठा मिळवण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०१६ला कोटेशन स्वरुपात ५२०० रुपयांचा भरणा केला तेव्हापासून आत्तापर्यंत संबंधित शेतकऱ्याला कोणताही विद्युत पुरवठा करण्यात आला नाही, तरीसुद्धा विद्युत कंपनीकडून शेतकऱ्याला २८ हजार ६१० रुपये बिल पाठविण्यात आले. संबंधित शेतकऱ्याच्या शेतात विद्युत कंपनीने अद्यापपर्यंत विद्युत खांब उभे केले नसून मीटरसुद्धा बसविले नसल्याची तक्रार करण्यात आली हाेती. यासंदर्भात लाेकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करुन महाविरणचे याकडे लक्ष वेधले हाेते. याची दखल महावितरण कंपनीने घेतली.
या तक्रारीची महावितरणकडून ताबडताेब दखल घेऊन सात दिवसात वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
रिसोड येथील शेतकरी रामकिसन दवंडे यांनी सदरच्या बाबत योग्य ती चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली हाेती. २४ फेब्रुवारी राेजी महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नेश्वर तायडे, उपअभियंता फुलझडे यांनी गुगळे यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली. तसेच चूक मान्य करीत येत्या सात दिवसात विदयुत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले, यावेळी शेतकरी दवंड, विदुयत कर्मचारी अतुल थेरसह आदिंची उपस्थिती हाेती.