आता खासगी प्रवासी वाहनांची २० टक्के दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:53+5:302021-08-18T04:47:53+5:30

वाशिम : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा वाहतूक क्षेत्राला बसला आहे. या दरवाढीने खासगी प्रवासी वाहनांची ३५ ...

Now 20 per cent increase in private passenger vehicles | आता खासगी प्रवासी वाहनांची २० टक्के दरवाढ

आता खासगी प्रवासी वाहनांची २० टक्के दरवाढ

Next

वाशिम : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा वाहतूक क्षेत्राला बसला आहे. या दरवाढीने खासगी प्रवासी वाहनांची ३५ टक्क्याने भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे स्पेशल वाहन (जीप) करून बाहेरगावी जाणाऱ्यांचा प्रवासही आता महागला आहे. पूर्वी स्पेशल वाहनासाठी १० रुपये प्रति किलोमीटरने भाडे आकारले जात होते, आता १२ रुपये एका किलोमीटरसाठी द्यावे लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने चांगलाच भडका घेतला आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्रातील भाडेवाढ करण्याशिवाय चालक व मालकांना पर्याय राहिला नाही. या इंधन दरवाढीची झळ ही प्रवासी आणि वाहन मालक या दोघांनाही बसत आहे. १० ते १२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपचे पूर्वी प्रतिकिलोमीटर १० रुपये भाडे आकारले जायचे, परंतु पेट्रोल, डिझेल महागल्यापासून या दरात प्रवासी वाहतूक करणे परवडत नसल्याचे वाहन मालकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १० ते १२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपचे १२ ते १४ रुपये प्रति किलोमीटरचे भाडे आकारले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहन मालकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.

०००००००००००००००००००

असे वाढले पेट्रोल, डिझेलचे दर

वर्ष पेट्रोल - डिझेल

जानेवारी २०१९ - ७२.९६ - ६६.६९

जानेवारी २०२० - ७९-७६ - ७९.८८

जानेवारी २०२१ - ९१.१७ - ८१.४७

ऑगस्ट २०२१ -१०८-३२ - ९७.४१

०००००००००००००००००००

प्रवासी वाहनांचे दर

वाहनाचा प्रकार - दर

जीप - १२

कार - १४

मिनी बस - १२

ट्रॅव्हल्स - १२

०००००००००००००००००००

गाडीचा हप्ता कसा भरणार?

कोट :

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने प्रवासी वाहने चालविणे मोठे अवघड झाले आहे. दूरच्या प्रवासाठी गाडी भाड्याने नेण्यासाठी प्रवाशांना १२ ते १४ रुपये जास्त वाटतात; परंतु डिझेलचे दरच एवढे वाढलेले आहेत, की गाडी रोडवर आणणे परवडत नाही.

- प्रवीण ठाकरे, वाहनचालक

कोट :

इंधन दरवाढीने प्रवासी वाहतुकीचे दर वाढविण्याची वेळ आली आहे. आम्हालासुद्धा कमी दरामध्ये परवडत नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सध्या २० ते २५ टक्क्याने भाडेवाढ झालेली आहे.

- भुरान बेनिवाले, वाहनचालक

Web Title: Now 20 per cent increase in private passenger vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.