आता उपसरपंच पदासाठी लावली जातेय फिल्डिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 08:08 PM2017-10-29T20:08:40+5:302017-10-29T20:11:01+5:30
वाशिम: पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २७३ आणि दुस-या टप्प्यात १४ अशा एकूण २८७ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर, आता उपसरपंच पदासाठी आपला समर्थक, हितचिंतक विराजमान करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २७३ आणि दुस-या टप्प्यात १४ अशा एकूण २८७ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर, आता उपसरपंच पदासाठी आपला समर्थक, हितचिंतक विराजमान करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणाºया २७३ ग्राम पंचायती आणि डिसेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणाºया १४ ग्राम पंचायतचे सरपंच थेट जनतेतून निवडल्यानंतर आता केवळ उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक विभागाने अद्याप उपसरपंच पदाच्या निवडणुक तारिखा जाहिर केलेल्या नाहीत. तथापि, उपसरपंच पदासाठी स्थानिक राजकीय नेते, आघाडी प्रमुखांकडून आतापासूनच फिल्डिंग लावली जात असल्याचे दिसून येते. काही ग्रामपंचायतमध्ये सरपंच एका गटाचा तर सदस्य संख्येचे बहुमत दुसºया गटाकडे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सदस्यांमधून उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे, सदस्य संख्येचे गणित जुळवून आणण्यासाठी आघाडी प्रमुखांकडून व्यूहरचना आखली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे नेतेदेखील आपला समर्थक, हितचिंतक उपसरपंचपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. उपसरपंच पदाची निवडणूक तारिख केव्हा जाहिर होते, याकडे २८७ ग्रामपंचायतींचे लक्ष लागून आहे.