रिसोडकरांना आता शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:21+5:302021-05-06T04:43:21+5:30

रिसोड : येथील ४५ हजार नागरिकांना पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे, या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, नगरपरिषद ...

Now pure water supply to Risodkars | रिसोडकरांना आता शुद्ध पाणीपुरवठा

रिसोडकरांना आता शुद्ध पाणीपुरवठा

Next

रिसोड

: येथील ४५ हजार नागरिकांना पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे, या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, नगरपरिषद प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अवघ्या तीन ते चार दिवसांत पाणीपुरवठामधील तांत्रिक अडचण दूर करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला.

अडोळ प्रकल्पमार्फत रिसोड येथे बारमाही पाणीपुरवठा होत असतो. मागील पंधरा दिवसांपासून पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत लोकमतमध्ये ३० एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत मुख्याधिकारी गणेश पांडे, नगराध्यक्ष विजयमाला अासंनकर, पाणीपुरवठा सभापती पप्पीबाई कदम व शाखा अभियंता राकेश जाधव व कर्मचारी यांनी तांत्रिक अडचण दूर करून रिसोडकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रयत्न केले. ५ मे पासून रिसोडकरांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.

Web Title: Now pure water supply to Risodkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.