मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात आता सोनोग्राफीची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:43 PM2017-12-15T14:43:44+5:302017-12-15T14:45:05+5:30
मंगरुळपीर : ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दर गुरुवारी सोनोग्राफीची सेवा देण्यात येईल. याकरिता ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेची नोंदणी करणे आवश्यक आहे.
मंगरुळपीर : ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दर गुरुवारी सोनोग्राफीची सेवा देण्यात येईल. याकरिता ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेची नोंदणी करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही सुविधा संपूर्ण गरोदर काळात फक्त एकदाच सोनोग्राफी करण्यात येईल. याकरिता ग्रामीण रुग्णालयातुन संदर्भ सेवा चिठ्ठी घेवुन कान्होबा सोनोग्राफी केंद्र डॉ.महादेव राठोड यांच्याकडे जावुन सोनाग्राफी मोफत करुन घेणे, तसेच ज्या गरोदर मातेची पहिली, दुसरी प्रसृती सिझर झाले आहे. अशाच गरोदर मातेसाठी ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे सिझरची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा गरोदर मातेनी आशा एएनएम यांच्याशी संपर्क साधावा व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.श्रीकांत जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप नव्हाते यांनी केले.