मतदारांच्या मदतीसाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 03:07 PM2019-02-03T15:07:03+5:302019-02-03T15:07:27+5:30

वाशिम : मतदार यादीमध्ये नाव आहे का, मतदार यादीमध्ये नावाचा समावेश कसा करावा. तसेच यादीतील नावात दुरुस्ती कशी करावी, यासह निवडणूक प्रणालीबाबतची माहिती मतदारांना आता एका ‘कॉल’वर मिळणार आहे.

Now toll free number to help voters! | मतदारांच्या मदतीसाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक!

मतदारांच्या मदतीसाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मतदार यादीमध्ये नाव आहे का, मतदार यादीमध्ये नावाचा समावेश कसा करावा. तसेच यादीतील नावात दुरुस्ती कशी करावी, यासह निवडणूक प्रणालीबाबतची माहिती मतदारांना आता एका ‘कॉल’वर मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेत जिल्हा समर्पक केंद्र सुरू करण्यात आले असून १९५० हा ‘टोल फ्री’ क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांच्या मनामध्ये असणाºया शंकांचे निरसन व्हावे. निवडणूक प्रणालीबाबत त्यांना माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हा निवडणूक शाखेमध्ये जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात कार्यान्वित करण्यात आलेल्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन मतदारांना आवश्यक माहिती प्राप्त करून घेता येणार आहे. तसेच आपली तक्रारही नोंदविता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी केले आहे.

Web Title: Now toll free number to help voters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.